Success Stories

नाव: संदीप हनुमंत धनावडे
राहणार: आंबेगाव, तालुका कडेगाव, सांगली
घराची माहिती: आई, वडील, वडील पुणे येथे स्कूल बस चालवतात, शेती नाही
शिक्षण: बारावी IIEDR प्लंबिंग कोर्स
कोणत्या वर्षी प्लंबिंग चा कोर्स केला: 2011 TAP batch 2

पूर्व इतिहास व प्लंबिंग का निवडले:
कोर्स करण्यापूर्वी हार्डवेअरच्या दुकानात तीन वर्ष काम केले मार्केट मधून मटेरियल आणणे साफसफाई करणे अशी कामे करायचो. याच दुकानात प्लंबिंग कोर्स बद्दल माहिती मिळाली व या विषयाबद्दल उत्सुकता वाटली म्हणून संस्थेत प्रशिक्षणासाठी रुजू झालो.

 

प्रशिक्षणात काय काय नवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या:
प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर एक प्रकारची शिस्त आम्हास लावली गेली. रोज सकाळी पहाटे उठणे व्यायाम करणे साफसफाई करणे इतर सर्व गोष्टी आवरून मग प्रशिक्षणास सुरुवात होत असे.

मनाची मशागत: मनावर ताबा कसा मिळवता येतो, रागावर ताबा कसा ठेवता येतो किंवा समोरच्या व्यक्तीशी आपण कसा संवाद साधला पाहिजे या सर्व गोष्टी आम्हास या प्रशिक्षणामुळे समजल्या. या प्रशिक्षणाचा मला आता चांगलाच फायदा होत आहे. ग्राहकांशी कसा संवाद साधायचा किंवा आपल्या हाताखालील माणसांशी कसे बोलावे, कसे वागावे हे समजल्यामुळे मी माणसे जोडत गेलो.

तांत्रिक प्रशिक्षण टेक्निकल ट्रेनिंग:
तांत्रिक शिक्षणाचा खूप उपयोग होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गणिताचा, ज्यामध्ये मूल्यांकन(Calculations) कसे करावे ते कळले. कोर्स केल्यानंतर AutoCad केले त्यात गणिताचा फार उपयोग झाला.

प्रशिक्षणाचा नेमका उपयोग पुढे कसा व काय झाला:
कोर्स झाल्यानंतर ऑटोकॅड केले. एक वर्ष प्लंबिंग चे काम केले. MEP कन्सल्टंट कडे तीन वर्ष काम केले. ड्रॉइंग वाचता येऊ लागले. स्वतः ड्रॉईंग काढू लागलो. ड्रॉइंग प्लंबिंग चा प्राण आहे म्हणजे साईट वरील परिस्थिती बघून ड्रॉईंग करता आले पाहिजे. प्लंबिंग बरोबर इलेक्ट्रिकल चे ज्ञान देखील थोडे हवे कारण बाहेरील देशातील मटेरियल हाताळण्यासाठी इलेक्ट्रिकल व प्लंबिंग चे ज्ञान असणे आवश्यक आहे.

पुढील वाटचाल:
MEP मध्ये तीन वर्ष काम केले नंतर पंचशील ग्रुप येरवडा येथे एक वर्ष काम केले. तिथे सर्व काम हाय क्वालिटी चे होते. यानंतर प्रीसेन ग्रुप बरोबर सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून लोक हाताशी घेऊन काम सुरू केले. आज अडीच वर्षे झाली मी काम करतोय. 11 लोक माझ्याकडे काम करतात. आता स्वतंत्र बंगल्यांची कामे करतो. आता मासिक उत्पन्न साधारण रुपये साडे तीन लाख आहे. वर्षाला सुमारे पंचेचाळीस लाखापर्यंत उत्पन्न जाते. 2019 वर्षात मला माझा व्यवसाय एक कोटीच्या घरात न्यायचं आहे हे माझं स्वप्न आहे.

युवकांना संदेश:
कष्ट केल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत. कष्टाला पर्याय नाही. आजही मी हाताखालील एखादी व्यक्ती कामाला आली नाही की स्वतः काम पूर्ण करतो. माणूस नाही म्हणून अडून बसत नाही. कुठल्याही कामाची लाज बाळगू नये. कष्ट केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. कधीकधी सकाळी आठ ते रात्री दोन वाजेपर्यंत हाताने काम करावे लागते.

माझे प्रोजेक्ट्स:
१. श्री जवाहर चोरगे, पुणे एस पीज बिर्याणी हाऊस, निसर्ग होटेल प्रभात रोड येथील बंगला
२. राम ग्रुप श्री नरेश पंजाबी उद्योगपती यांचा बंगला
३. व्यंकटेश्वरा बिल्डर्स, श्री लहु आजबे अंकुश अजबे या मोठ्या व्यावसायिकांचे बंगले
४. श्री धनंजय मुंडे राष्ट्रवादी पक्षाचे नेते यांच्या सोसायटीचे काम
५. पु ना गाडगीळ ज्वेलर्स 29 शाखांचे काम केले व आजही तेथील रिपेयर व मेंटेनन्स चे काम बघत आहे
६. आर देव ठक्कर कल्याण येथील बँक्वेट हॉल चे काम

आंतरराष्ट्रीय स्पर्धा:
2016 साली खज मार्फत साउथ आफ्रिकेत एका स्पर्धेनिमित्त गेलो होतो. तेथे अजून चार देशातील प्रतिस्पर्धी देखील आले होते. आम्हाला दोनशे लोक जे टॉयलेट वापरत होती व तेथील वस्तू चोरीला जात होत्या त्यावर उपाय करण्याचे आव्हानात्मक काम दिले होते. आम्ही तो प्रोजेक्ट पूर्ण केला व आमचा पहिला नंबर आला. त्यानंतर भारतात आल्यावरही आमचे जंगी स्वागत करण्यात आले.

ऋणनिर्देश:
आज जो मी प्रामुख्याने आहे तो ज्ञानदा संस्थेच्या प्रशिक्षण व संस्थेने दिलेल्या मार्गदर्शनामुळे आहे. विशेषतः संस्थेतील श्री विद्याधर गोखले व कै.रवींद्र नवाथे यांचे ऋण विसरू शकत नाही. भविष्यामध्ये स्वतःची कंपनी सुरू करण्याची माझी कल्पना आहे व संस्थेतील प्रशिक्षण झालेल्या युवकांना माझ्या कंपनीत रोजगार देण्याचा माझा मानस आहे. मी जून 2018 पासून दर शनिवार व रविवार वाघोली येथे साईटवरच्या बारकाव्याचे प्रशिक्षण देण्याकरिता येण्यास सुरू करणार आहे, जेणेकरून होतकरू तरुणांच्या ज्ञानात भर पडेल व मार्गदर्शन मिळेल.


नाव: नागेश सुरेश आव्हाड
राहणार: उंदीर गाव, तालुका श्रीरामपूर, अहमदनगर
परिवाराची माहिती: आई-वडील, भाऊ, वडील शेती करतात भाऊ पुण्यात सरपंचाचा

अंगरक्षक म्हणून काम करतो
शिक्षण: एस वाय बी ए IIEDR course
कोणत्या वर्षी प्लंबिंग चा कोर्स केला: 2015 बार्टी बॅच 1

 

पूर्व इतिहास व प्लंबिंग का निवडले:
कोर्स करण्यापूर्वी गावी छोटी मोठी कामे करून शिक्षण चालू होते. पण गावी प्रगती करण्यासाठी चांगली नोकरी उपलब्ध नाही म्हणून वर्तमानपत्रातील जाहिरात वाचून कोर्सला प्रवेश घेतला. प्रगती करण्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे हे लक्षात येता प्रशिक्षणासाठी त्वरित प्रवेश घेतला.

कोर्स कसा वाटला व दिनचर्या:
प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर एक प्रकारची शिस्त आम्हास लावली गेली. रोज पहाटे उठणे व्यायाम करणे साफसफाई करणे इतर सर्व गोष्टी आवरून मग प्रशि:क्षणास सुरुवात होत असे.

मनाची मशागत Mindset ट्रेनिंग:
या प्रशिक्षणामुळे पुण्यासारख्या ठिकाणी कसं वागायचं कसं बोलायचं हे कळलं. आम्ही खेड्यातून आलेलो असल्यामुळे एका नवीन वातावरणाशी आमचा संबंध येत होता त्या वातावरणाशी कसे एकरूप व्हावे हे आम्हाला या प्रशिक्षणातून कळले.
श्रीयुत गोखले सर यांनी जे टेक्निकल ट्रेनिंग आम्हाला दिले ते अजूनही आमच्या दैनंदिन कामात उपयोगी पडते त्या शिक्षणाचा वापर मी अजूनही करत आहे.

प्रशिक्षणाचा नेमका उपयोग पुढे कसा व काय:
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर झिंबर या कंपनीत मी रुजू झालो. तिथे मला मोठ्या कंपनीचे काम करावयास मिळाले. या प्रशिक्षणामुळे मला या कामातील बारकावे चांगले समजून घेता आले व माझ्या ज्ञानात भर पडत गेली. आता मी सर्व प्रकारचे प्लंबिंग प्लंबिंग रिपेअर मेंटेनन्स एकट्याने करू शकतो.

पुढील वाटचाल:
झिंबर मध्ये साधारण दीड वर्ष काम केल्यानंतर मी Nest way या कंपनीत रुजू झालो. तिथे आधी रुपये 22 हजार महिना पगार मिळू लागला. सुरुवातीला एक्झिक्युटिव्ह म्हणून नेमणूक झाली. काही कालावधीनंतर सीनियर एक्झिक्यूटिव्ह व आता सध्या मी मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. माझ्या हाताखाली बारा माणसं काम करतात आणि सध्याचे मासिक उत्पन्न रुपये 29000 आहे आता सुमारे चार वर्षांचा अनुभव माझ्या गाठीशी आहे.

माझे प्रोजेक्ट्स:
झिंबर मध्ये असताना खालील कंपन्यांची कामे केली.
१. फीडेक्स इंटरनेशनल कंपनीचे काम व त्यांचे रिपेयर मेंटेनन्स चे काम
२. गेरा स्काय विला हिंद वेअर चे पार्ट हाताळायला मिळाले
३. ब्लू रिज रिपेअर मेंटेनन्स चे काम

स्पर्धा:
झिंबर मध्ये असताना आठशे लोकांमध्ये एक स्पर्धा झाली होती कि कोण जास्त काम करू शकतो. आम्ही संस्थेत माइंड सेट असे प्रशिक्षण घेतल्यामुळे आम्हाला लोकांशी कसे बोलावे कसे वागावे हे चांगलेच माहिती होते. त्यामुळे आम्ही कस्टमरवर आमच्या कामाचा व आमच्या बोलण्याचा प्रभाव पाडू शकलो. त्यातील काही लोक 70 वय वर्ष असणारे अनुभवी व काही आमच्यासारखे 19 ते 20 वय असणारे होते. पण एवढा अनुभव असणारे लोक असूनही ते कस्टमरला समाधानी करू शकत नव्हते जे की आम्ही करून दाखवले. या स्पर्धेत आमच्या ग्रुपला प्रथम क्रमांक मिळाला. या ग्रुप मध्ये माझ्या सोबतीला आपल्याच संस्थेचे शिकलेला कृष्णा शिंदे व किरण एडके हे दोघं होते.

युवकांना संदेश:
कष्ट केल्याशिवाय चांगले दिवस दिसत नाहीत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मी जेव्हा कामाला रुजू झालो तेव्हा मला कधीकधी सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत देखील काम करावे लागत होते. पण जर मी तिथेच काम सोडून गावी गेलो असतो तर आज ह्या पदावर पोहोचलो नसतो. त्यामुळे किमान दोन वर्ष तरी कष्ट करा नंतर तुम्हाला हवं तसं यश नक्की मिळेल.


नाव: पुरुषोत्तम अशोक सरोदे
राहणार: सोलापूर
घराची माहिती: आई वडील दोन नुकत्याच लग्न झालेल्या बहिणी स्वतः अविवाहित
कोणत्या वर्षी प्लंबिंग चे प्रशिक्षण पूर्ण केले: पहिली बॅच 2010-11

 

 

पूर्व इतिहास व प्लंबिंग का निवडले:
बीएससी चे पहिले वर्ष झाल्यानंतर शिक्षण अर्धवट राहिले घरची परिस्थिती खूप चांगली नव्हती त्यामुळे प्रिंटिंग प्रेसमध्ये दरमहा सहा हजार मध्ये नोकरी सुरुवात केली. परंतु तोकड्या कामावर समाधानी न राहता प्रामाणिकपणे व कष्टाने काहीतरी वेगळे करून स्वतःची प्रगती करण्याची जिद्द मनात होती. त्यातच ओळखीच्या कार्यकर्त्याकडून संस्थेच्या कोर्स विषयी माहिती मिळाली. या क्षेत्राशी दुरूनही संबंध नसताना भरपूर कष्टाची तयारी असल्याने या कोर्सचे भविष्यातील उज्वल यश पाहून मी हा कोर्स करण्याचे ठरविले.

प्रशिक्षणात काय काय नव्या गोष्टी शिकण्यास मिळाल्या:
अभ्यास लिखाण काम कमी व प्रत्यक्ष काम करण्याचे प्रात्यक्षिक जास्त त्यामुळे यात मी खूप रमून जात होतो. तसेच सकाळी लवकर उठणे प्रार्थना व्यायाम स्वतःची कामे स्वतः करणे त्याचा सुरुवातीस खूप कंटाळा वाटायचा परंतु नंतर हळूहळू सवय होत गेली. माइंडसेट च्या कार्यक्रमांमधून कष्टाविण फळ ना मिळते हे उमगले आणि त्याचा विचार केला त्यानुसार हा कोर्स मी मनःपूर्वक पूर्ण करण्यात यशस्वी झालो.

प्रशिक्षणाचा नेमका उपयोग पुढे काय झाला:
प्रशिक्षणाच्या आवडीमुळे संस्थेतील शिकवणीमुळे ग्राहकांशी कसे बोलायचे याचे शिक्षण घेतले होते त्याचा फायदा झाला. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिलेला शब्द पाळणे, कारण तुम्ही ग्राहकांची वेळ पाळली पाहिजे एक वेळ त्यांना भेटून तुमच्या अडचणी सांगितल्या संस्थेस सहकार्य करतात पण नुसती टोलवाटोलवी केली तर ग्राहक नाराज होतो दुखावतो परिणामी त्याचा तोंडी प्रसार होतो व बदनामी होते. त्यामुळे कामे न मिळणे हा प्रकार सुरू होतो. त्यामुळे ग्राहकांना कधीही नाराज करू नये. या व्यवसायामध्ये काम सुरु करण्यासाठी ग्राहकांचा विश्वास संपादन करणे फार आवश्यक आहे. संस्थेतील या शिकवणीमुळे व्यवसाय सुरू करण्यास अडचण आली नाही.

नोकरी व व्यवसायाचे आत्तापर्यंत प्रगती कशी झाली:
मी प्रिंटिंग बरोबरच सुरुवातीला प्लंबिंग ची कामे घेत होतो. प्रामाणिकपणा कष्ट व संपर्क यातून पुढे प्लंबिंग ची कामे वाढली या सर्व गोष्टी मी काटेकोरपणे पाळतो. त्यामुळेच आता सोलापुरात विश्वासू प्लंबर म्हणून बरीच कामे आली आहेत. चांगल्या कामामुळे मी स्वतः श्री बालाजी ट्रेडर्स या नावाने व्यवसाय करीत आहे. प्लंबिंग करताना असे आढळले की ग्राहक विश्वासाने त्यांना लागणारे मटेरियल आणावयास सांगतो त्यामुळे स्वतः मटेरियल पुरवणे सुरू केले. सध्या माझे दरमहा उत्पन्न 50 हजारापर्यंत आहे केवळ प्लंबिंग मध्ये मी मनःपूर्वक कष्ट केल्याचे फळ म्हणजे सहा हजारापासून सुरुवात करून मी आज ह्या स्थितीपर्यंत आलो आहे तरी अजून खूप मजल मारायची आहे. या सर्व गोष्टीमुळे माझ्याकडे गुजरात मधील निव्या कंपनी कडून प्लंबिंग कामासंदर्भात विचारणा झाली असून लवकरच त्याचे काम मिळेल.

नवीन लोकांना काय सांगशील:
कष्ट प्रामाणिकपणा विश्वास याबरोबरच जिद्द महत्त्वाची आहे. पैसे मिळवण्यासाठी तुमच्या आवडीचा उपयोग केल्यास आपण नक्की यशस्वी होतो. या सर्व गोष्टींबरोबर चांगला व योग्य मार्गदर्शक लावणे गरजेचे आहे. सुदैवाने मला संस्थेने व सर्वांनी खूप चांगले मार्गदर्शन केले त्याचे चांगले परिणाम मी पाहतो आहे.

error: Content is protected !!