वृक्षारोपण

DIFPT संस्थेच्या आवारात Being Volunteer व SVP India यांच्या मदतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या अंतर्गत दीडशेहून अधिक झाडे लावली गेली. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, सर्व झाडे भारतीय आणि त्याहून अधिक स्थानिक वातावरणात वाढणारी आहेत. हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे संस्थेचे काही विशिष्ट उद्देश होते. एक म्हणजे अधिक प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या स्थानिक झाडांना नव्याने महत्व प्राप्त करून देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष संवर्धनाची आवड निर्माण करणे दुसरे म्हणजे कॅम्पसला हिरवं गार बनविणे. DIFPT निसर्गाच्या संवर्धनावर ठाम विश्वास ठेवते आणि निसर्गासाठी अनुकूल अशा नवीन गोष्टी करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते.

error: Content is protected !!